शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

वाशिम जिल्ह्यात सरपंच, सदस्यांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:22 IST

३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील ईलखी ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी २३ जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार २२ मे २०१९ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ३१ मे ते ६ जून २०१९ या कालावधीत स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ जून २०१९ रोजी होईल. १० जून २०१९ रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास २३ जून २०१९ रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होणार असून २७ जून २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीजिल्ह्यातील ५ ग्रामपंचातींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील गोंडेगाव, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीराज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील बोरी, गोंडेगाव, पंचाळा, सुपखेला, ढिल्ली, कळंबा महाली, रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द, दापुरी खु. केशवनगर, मांडवा, रिठद, करंजी, मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे, रिधोरा, गांगलवाडी, डोंगरकिन्ही, मंगरूळपीर तालुक्यातील पाडीर्ताड, भडकुंभा, निंबी, रामगड, कारंजा तालुक्यातील उंबडार्बाजार, धनज बु., अंतरखेड, भुलोडा, डोंगरगाव, महागाव, मानोरा तालुक्यातील गादेगाव, अभई खेडा, देवठाणा या ग्रामपंचायतींमध्ये रिक्त सदस्य पदांसाठी पोट निवडणूक होत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक