शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडणुकीत काँग्रेसला स्वकियांची बंडखोरी भोवली!

By admin | Updated: July 9, 2016 00:56 IST

वाशिम जिल्हा परिषद: काँग्रेस-राकाँ तीन तर एका जागेवर सेना विजयी.

वाशिम: वाशिम जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. उर्वरित तीन जागेवर काँग्रेसचे दोन तर राकाँच्या एका उमेदवाराचा विजय झाला. सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १२ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने ८ जुलै रोजी ही निवडणूक घेण्यात आली.जिल्हा परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७, शिवसेना १0, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, भारिप-बमसं तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असे पक्षीय बलाबल आहे. चार विषय समितीच्या सभापतिपदाची निवडणूक काँग्रेस-राकाँ-अपक्ष व भारिप-बमसंची आघाडी सहज जिंकेल, असा अंदाज वर्तविला जात होते. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मात्र सभागृहात काँग्रेसच्याच काही सदस्यांनी वेगळेच ह्यराजकारणह्ण शिजविले. दुपारी ३ वाजता हात उंचावून मतदानाला सुरुवात झाली. प्रथम समाजकल्याण समिती सभापती पदासाठी मतदान झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पानुताई दिलीप जाधव यांनी भाजपाच्या रत्नप्रभा घुगे यांचा सात मताने पराभव केला. जाधव यांना २९ तर घुगे यांना २२ मते मिळाली. महिला व बालकल्याण विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या यमुना सीताराम जाधव यांनी शिवसेनेच्या रेखा सुरेश मापारी यांचा दोन मताने पराभव केला. जाधव यांना २७ तर मापारी यांना २४ मते मिळाली. दोन विषय समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसचे सुधीर गोळे व राजेश जाधव, शिवसेनेचे विश्‍वनाथ सानप आणि राकाँचे देवेंद्र ताथोड निवडणूक रिंगणात होते. सर्वाधिक २७ मते घेऊन सुधीर गोळे विजयी झाले. दुसर्‍या पदासाठी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने आणि काँग्रेसच्या एका सदस्याचे मतदान अवैध ठरल्याने शिवसेनेचे विश्‍वनाथ सानप एका मताने विजयी झाले. सानप यांना २५ तर राजेश जाधव यांना २४ व देवेंद्र ताथोड यांना २३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे विकास गवळी व सुखदेव मोरे या दोन सदस्यांनी सेनेचे विश्‍वनाथ सानप यांना मतदान केले तर काँग्रेसच्या ज्योती गणेशपुरे यांनी तीन उमेदवारांना मतदान केल्याने त्यांचे मत अवैध ठरविण्यात आले. यामुळे सेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. राकाँचे देवेंद्र ताथोड व मीना भोने हे दोन सदस्य सेना-भाजपा युतीसोबत गेल्याचा फटकाही काँग्रेस-राकाँ युतीला बसला.