शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर?

By admin | Updated: June 5, 2014 00:58 IST

वाशिम जिल्ह्यातील ३ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे

वाशिम : जिल्ह्यातील ३ नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक जून महिन्यात होत आहे; मात्र या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वाशिम सह मंगरूळपीर व कारंजा येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जून महिन्यात संभावित आहे. लोकसभा निवडणूकीत आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. अशातच लोकसभा निवडणुकीची आआचारसंहिता आणि आता शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू झाल्याने नगराध्यक्षांना कामे करणे कठीण झाले आहे. चार महिन्यांचा कालावधी आचारसंहि तेमध्ये गेल्याची बाब बहुतांश नगराध्यक्षांनी सरकारकडे विशद केली आहे. आचारसंहितेच्या काळात जी काही विकास कामे करता आली नाही ती कामे पूर्ण करता यावी यासाठी जूनमध्ये होणार्‍या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकांनंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या या मागणीवर सरकार अनुकूल असुन हा विषय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केल्यानंतर यासंदर्भात अधिसूचना काढण्याची तयारीदेखील शासनाची असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय गत्यंतर नाही, असा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे.