शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी आठ जण ताब्यात !

By admin | Updated: October 30, 2015 01:58 IST

मालेगाव दंगल प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू.

मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव येथील मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूक दरम्यान दगडफेक, मारहाण व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी नऊ दोषींसह अज्ञात जमावाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. दगडफेकप्रकरणी आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल असलेले आरोपी फरार आहेत. सोमवारला दगडफेकीची ही घटना घडल्यानंतर मंगळवारपयर्ंत मालेगाव शहर दहशतीखाली होते. बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी भेट घेऊन आढावा घेतला आणि जनजीवन सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले. बुधवारपासून मालेगाव शहर पूर्ववत होत असल्याचे दिसून आले. दंगलीच्या या घटनेला जबाबदार धरून दोषींविरूद्ध गुन्हे दाखल केले. दोषींना पकडण्याचे धाडसत्र सुरू झाले असून, शहरवासीयांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी मालेगावची बाजारपेठ पूर्ववत झाली. गुरूवारी जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. मालेगावच्या घटनेवर व एकंदर परिस्थितीवर अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल व पोलीस अधीक्षक विनिता साहू लक्ष ठेवून आहेत. शहरवासीयांच्या एकतेतून शहर लवकरच पूर्वपदावर येत आहे. धार्मिक भावना दुखावणार्‍या फ्लेक्स प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नांदगावकर करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेच्या चवथ्या दिवशीही आरोपी पकडल्या गेले नाहीत. वाहन नुकसान प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलवंत यांच्याकडे असून ते ३५ सीसी कॅमेर्‍याच्या सहाय्याने तपास सुरु आहे.