शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

२० रुपयांत आठ किलो टरबूज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST

कामरगाव : यंदा शेतकऱ्यांना नानाविध संकटाला सामोरे जावे लागत असून, कडक निर्बंध असल्याने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ ...

कामरगाव : यंदा शेतकऱ्यांना नानाविध संकटाला सामोरे जावे लागत असून, कडक निर्बंध असल्याने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.

सततच्या पावसाने मागील वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने खरिपातील तोटा रबीत भरून काढावा या उद्देशाने सिंचनाची सोय असलेल्या कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतीमशागतीपासून बियाणे व खते, खरेदी तसेच पुढील मशागतीसाठीही खर्च केला. बाजारात टरबुजाची विक्री करण्याच्या वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आले. परिणामी, टरबुजाची विक्री थांबली. सुरुवातीला प्रतिकिलो दराने होणारी टरबुजाची विक्री नगावर येऊन पोहोचली. आणि त्याही पुढे जाऊन आजमितीला २० रुपयांत दोन, अडीच किलोचे एक टरबूज याप्रमाणे चार टरबूज विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यामुळे शेतकरी गारद झाला आहे. आजमितीला टरबूज विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे. संचारबंदी, कडक निर्बंधाचा सर्वाधिक फटका भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर भाजीपाला सडल्याचे, याशिवाय टरबुजाची विक्री न झाल्याने टरबूज रस्त्यावर फेकून दिल्याचे प्रकार यापूर्वी कामरगाव परिसरात घडले आहेत. भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनाही शासनाने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.