लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : तालुक्यातील ग्राम भूर येथे जंगलात चरायला गेलेली आठ गुरे दगावल्याची घटना १७ जुलै रोजी घडली. विशेष म्हणजे या गुरांचा सांभाळ करणारे भूमिहिन असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. गंगाराम नामदेव देवळे यांच्या ४ बकऱ्या आणि २ वासरे, प्रशांत नवटक्के व कुंडलिक तायडे यांची यांची प्रत्येकी एक बकरी या घटनेत दगावली आहे. वृत्त लिहिस्तोवर दगावलेल्या गुरांचे शवविच्छेदन झालेले नव्हते. त्यामुळे घटनेमागील नेमके कारण कळू शकले नाही.
जंगलात चरायला गेलेली आठ गुरे दगावली!
By admin | Updated: July 17, 2017 18:42 IST