शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठय़ाला प्राधान्य!

By admin | Updated: March 22, 2016 02:24 IST

वाशिम जिल्हा परिषदेचे ७२ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक; मानव विकास निर्देशांक वाढविण्याचा प्रयत्न!

वाशिम: सन २0१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक ७२ हजार रुपये शिलकीचे सादर करीत, सन २0१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकात शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्यक्रम देण्यात आला. मानव विकास निर्देशांकात वाशिम जिल्ह्याचा सर्वांंत शेवटचा क्रमांक असून, मागासलेपणाचा ठपका पुसून काढण्यासाठी शिक्षण व आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारच्या अर्थसंकल्पीय सभेत केला.जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, सभापती सर्वश्री चक्रधर गोटे, सुभाषराव शिंदे, पानूताई जाधव यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला अधिकारी-पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सन २0१५-१६ चे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. या वर्षात १५ कोटी ४५ लाख ७६ हजार ४६१ रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, १५ कोटी ४५ लाख ४ हजार २१३ रुपये विविध विभागांच्या योजनांवर खर्च झाल्याचे सांगण्यात आले. सन २0१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक सादर करून विविध मार्गांंनी प्राप्त होणारे उत्पन्न ४ कोटी ९ लाख ९८ हजार २२९ रुपये अंदाजित असून, विविध योजना व विभागांसाठी एकूण खर्च ९ कोटी ४४ लाख ९३ हजार ३८१ रुपये होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. कृषी २0 लाख, महिला व बाल कल्याण ३६ लाख, समाजकल्याण ६८ लाख, पशुसंवर्धन ५ लाख, पाणीपुरवठा ६२ लाख, ग्रामीण रस्ते व देखभाल १ कोटी ४0 लाख अशी तरतूद आहे. वाशिम जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असल्याने सार्वजनिक आरोग्यासाठी १ कोटी ४0 लाख, तर शिक्षणासाठी ९0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आरोग्य, शिक्षण, शुद्ध पाणीपुरवठय़ाच्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भरीव तरतूद केल्याचे अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.