शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात ‘लालपरी’ला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा या चारच तालुक्यात एसटीचे आगार आहेत. मालेगाव आणि ...

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा या चारच तालुक्यात एसटीचे आगार आहेत. मालेगाव आणि मानोरा येथे बसस्थानक असले तरी या बसस्थानकांचा कारभार अनुक्रमे वाशिम आणि मंगरुळपीर येथील आगारातूनच चालतो. त्यात या चारही आगारात मिळून एकूण बसगाड्यांची संख्या १८० आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर आता एसटीच्या प्रवासी वाहतुकीला मोठा प्रतिसाद लाभत आहे. तथापि, जिल्ह्यातील चारही आगारांकडे बसगाड्यांची संख्या कमी असताना काही बसगाड्या नादुरुस्त असल्याने फेऱ्यांची जुळवाजुळव करताना आगार प्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यात रस्त्यावर बसगाड्या बंद होण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

आगारनिहाय बसगाड्यांची स्थिती

आगार एकूण बस नादुरुस्त

वाशिम ४८ ०४

कारंजा ४० ०४

मंगरुळपीर ४६ ०६

रिसोड ४४ ०४

------------------------------

एकूण १७८ १८

----------------------------

थंडीत, उन्हातान्हात प्रवाशांचा खोळंबा

एसटी महामंडळाच्या विविध आगारातील बसगाड्या काही वेळा पुरेशी तपासणी करून मार्गावर सोडल्या जात नाहीत. त्यात टायरची स्थिती चांगली नसते. अशावेळी मार्गावर धावत असलेली बस अचानक मध्येच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडते किंवा टायर पंक्चर होऊन थांबते. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत आहे, तर रात्री थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोणत्याही वेळी बस बंद पडली, तर प्रवाशांना भर रस्त्यावर थंडीवाºयात किंवा उन्हातान्हात ताटकळत त्रास सहन करीत दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागते.

-------------

कोट: आमच्या आगारात एकूण ४४ बसगाड्या आहेत. बसगाड्यांची संख्या कमी असल्याने वरिष्ठस्तरावर ४ गाड्यांची मागणी केली आहे. शिवाय ४ गाड्या नादुरुस्त असल्याने विभागीयस्तरावर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठविल्या आहेत. रस्त्यावर बस बंद पडल्यास चालक, वाहकाच्या सूचनेनुसार तत्काळ दुसरी बस संबंधित ठिकाणी पाठविली जाते.

-विनोद इलामे,

आगार प्रमुख वाशिम

------------

कोट: आमच्या आगारात ४० बसगाड्या असून, ३६ बसगाड्यांची स्थिती चांगली आहे, तर ४ बसगाड्या दुरुस्तीसाठी पाठविल्या आहेत. शिवाय काही नव्या गाड्यांची मागणीही केली आहे. रस्त्यावर बस बंद पडण्याचे प्रकार सहसा घडत नाहीत; परंतु असा प्रकार घडला, तर पर्याय म्हणून लगेच दुसरी बस संबंधित ठिकाणी पाठवून प्रवाशांची अडचण दूर केली जाते.

-मुकुंद न्हावकर,

आगार प्रमुख, कारंजा

---------------

कोट: एसटी महामंडळाच्या बसगाड्या मार्गात बंद होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. शुक्रवारी नागपूर आगाराची एक बस वाशिमकडे जात असताना मध्येच टायर फुटल्याने बंद पडली. या बसचे टायर जीर्ण असल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे बसमधील ६० पेक्षा अधिक प्रवाशांना पाऊण तास रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले.

-गजानन राठोड,

प्रवासी,