शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया सुलभ करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:47 IST

छत्रपती  शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आपले सरकार या संकेतस्थळावर कर्जमाफीचे  अर्ज भरण्याकरिता  विविध अडचणी उदभवत आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.

ठळक मुद्देछत्रपती  शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनाकर्जमाफीचे  अर्ज भरताना विविध अडचणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : छत्रपती  शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आपले सरकार या संकेतस्थळावर कर्जमाफीचे  अर्ज भरण्याकरिता  विविध अडचणी उदभवत आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.मानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी नगर पंचायत अस्तित्वात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी ‘कनेक्टीविटी व सर्व्हर डाऊन’च्या समस्येला वैतागले आहेत. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी कुटंूबासह  शहरातील सेतु सुविधा व अन्य केंद्रात यावे लागत आहे. अनेकवेळा रात्री जागरण करावे लागत आहे. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता महा-ई सेवा केंद्राकडे काम सोपविले आहे. पंरतु ई महा सेवा यांचेकडे तहसील कार्यालयाचे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर  कामे असल्यामुळे शेतकºयांचे मोफत अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसल्याचे चित्र मानोºयात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची पायपीट सुरू आहे. खासगी केंद्राकडे पैसे देऊन अचूक अर्ज भरला जाईल की नाही, याची खात्री नाही. अशा स्थितीत कर्जदार  शेतकरी यांना सन्मान योजना डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी मृत्यु झालेल्या कर्जदार सभासदाचा अर्ज कसा भरावा याबाबत  स्पष्ट सूचना नाहीत. तसेच वारसाकरिता सुध्दा अर्ज भरण्याकरिता कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. यासह विविध समस्या उदभवत असल्यामुळे शेकडो  शेतकरी कर्जमाफीचा आॅनलाईन अर्जापासून वंचित राहण्याची भीती अंजार पटेल यांच्यासह शेतकºयांनी निवेदनातून व्यक्त केली. तहसीलदारांना दिलेल्या या  निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे महसूल मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आदिंना पाठविण्यात आल्या.