वाशिम : डोहामध्ये पोहण्यास गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. शहरातील शुक्रवार पेठ परिसरातील रहिवासी ऋषिकेश बबन व्यवहारे हा बालक शेलूबाजार मार्गावरील खदानवर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात बुडाल्यामुळे ऋषिकेशचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद डॉ. नरेश उदगिरे यांनी दिली. ऋषिकेशचे वडिल महसूल विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ऋषिकेश हा सैनिक शाळा सुपखेला येथे शिक्षण घेत होता.
पाण्यात बुडाल्याने बालकाचा मृत्यू
By admin | Updated: September 6, 2014 00:04 IST