शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘द्वारका उत्सव’ नामशेष होण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: August 28, 2014 02:20 IST

वाशिमचा द्वारका उत्सव यंत्रयुगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

वाशिम : एकेकाळी राज्यात प्रसिद्ध असलेला वाशिमचा द्वारका उत्सव यंत्रयुगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या उत्सवात सहभागी होणार्‍या नागरिकांची गर्दी व बैलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. मूक जिवांवर आणि पर्यावरणावर प्रेम करण्याचा संदेश देणार्‍या या उत्सवाप्रती ओसरत असलेला उत्साह वाशिमच्या सांस्कृतिक क्षेत्रात चिंतेचा विषय बनला आहे.१९५४ च्या पूर्वीपासून वाशिममध्ये व्दारका उत्सव अविरत सुरू असला तरी, या उत्सवातील गर्दी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिलच्या इतिहासात या उत्सवाचा उल्लेख राज्यभर प्रसिद्ध असलेला उत्सव म्हणून अभिमानाने करण्यात आला आहे. १९५४ साली वाशिममधील चंदू माळी आणि नामदेव मामा यांनी सहभाग घेवून या उत्सवास व्यापक स्वरूप दिले होते. तेव्हापासून हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो; मात्र १0 वर्षांंपासून या उत्सवातील उत्साह हरवला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जाणार्‍या या उत्सवाच्या माध्यमातून प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा संदेश दिला जायचा. पोळय़ाप्रमाणेच या उत्सवातही बैलांचा समावेश मोठया प्रमाणात असायचा. आधुनिक युगात बैलांची जागा ट्रॅक्टर्सनी घेतली. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली. परिणामी, या उत्सवात सहभागी होणार्‍या बैलांची संख्या रोडावली. पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी, २६ ऑगस्ट रोजी वाशिम शहरात व्दारका उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात बैलांची संख्या कमी दिसून आली; तथापि देवपेठ व चामुंडा देवी व्दारका उत्सव मंडळाच्या सदस्यांसह इतरही कार्यकर्त्यांंनी वर्षानुवर्षांंपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यावर्षीही केला. ** वाशिम येथील व्दारका महाराष्ट्रात प्रसिध्द असून, या उत्सवामध्ये पोळयाच्या दुसर्‍या दिवशी व्दारका निघतात. कामटया व चमकीच्या कागदापासून उंच सचित्र व्दारका उभारतात. यामध्ये दिंडी, भजनी मंडळ, लेझीम पथक सहभागी होतात. शेतकरी आपल्या बैलाला सजवून या उत्सवात सहभागी करतात. सजविलेल्या बैलांना व दिंड्यांना बक्षिसेही वाटली जातात. ठरवून दिलेल्या मार्गावरून मिरणवूक काढली जाते आणि बालाजी मंदिरासमोर महाप्रसाद होतो. या उत्सवात पूर्वी तरूण - तरूणींचाही सहभाग असायचा.