शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप!

By admin | Updated: October 13, 2016 01:56 IST

वाशिम जिल्ह्यात मंगळवारपासून दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप देण्याला सुरूवात झाली.

वाशिम, दि. १२- जिल्ह्यात मंगळवारपासून दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप देण्याला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शिरपूरसह काही ग्रामीण भागात तर दुसर्‍या दिवशी अर्थात बुधवारी कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड शहरात दुर्गादेवीला ढोल ताशाच्या गजरात उत्साहात निरोप देण्यात आला. यावर्षी जिल्ह्यात ४८३ ठिकाणी दुर्गा देवीची मनोभावे स्थापना करण्यात आली होती. त्यात वाशिम शहर ४६ आणि ग्रामीण भागात २६, रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत ५२, मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत ५१, शिरपूर येथे ३६, मंगरुळपीर तालुक्यात ४८, अनसिंग येथे १४, आसेगाव २१, कारंजा शहरात ३५; तर कारंजा ग्रामीणमध्ये ५४,मानोरा येथे ४५ आणि धनज येथे ३१ दूर्गोत्सव मंडळांचा समावेश होता. दुर्गा विसर्जन शांततेत होण्याच्या दृष्टिकोनातून विसर्जनाचे तीन टप्पे पाडण्यात आले. पहिल्या टप्प्यात दसर्‍या दिवशी शिरपूर पोलीस स्टेशनांतर्गतच्या गावांमध्ये दुर्गामातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात कारंजा, मंगरुळपीर, रिसोड व मालेगाव शहरात भाविकांनी दुर्गामातेला भावपूर्ण निरोप दिला. सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांनी होम करून दुर्गादेवीची विधिवत पुजा केली. दहा दिवसात मंडळांसमोर दांडिया तसेच इतर धार्मिक कार्यक्रम व समाज प्रबोधनपर कार्यक्रम पार पाडले. दरम्यान, मंगळवारपासून दुर्गादेवी मंडळांनी विसर्जनला सुरूवात केली. विविध दुर्गामंडळांनी डीजे, ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत मिरवणुकीत सहभाग घेतला. यामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. तर महिलांनीही आपापल्या दुर्गादेवी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.विसर्जनासाठी तलावात येणार्‍या मंडळासाठी नगर पालिका तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. मोठय़ा मुर्तींंसाठी क्रेनचीही व्यवस्था केली होती. पाण्यात खोलवर जाऊ नये म्हणून वारंवार सूचना देण्यात येत होत्या. काही मंडळांनी दुर्गादेवीसमोर केलेले देखावे लक्षवेधक ठरले. गुरूवारी वाशिम व मानोरा येथे दुर्गादेवीचे विसर्जन होणार आहे.