शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

‘डम्पिंग यार्ड’ बनलेल्या तलावाला ‘जीवनदान’

By admin | Updated: May 9, 2016 01:51 IST

लोकसहभागाचा परिणाम: गाळ उपसण्याचे काम वेगात.

मंगरुळपीर : शहरातील प्राचीन गावतलावाचा मागील काही वर्षांंपासून कचरा टाकण्यासाठी (डम्पिंग यार्ड) उपयोग होत होता. त्यामुळे कधीकाळी शहराच्या जलसाठय़ात महत्त्वाचे स्थान असलेल्या या तलावाला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले होते; मात्र शहरातील काही समाजसेवकांनी एकत्रित येऊन आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संघटनेच्या सहकार्याने गेल्या आठ ते दहा दिवसात या तलावातील हजारो ब्रास गाळाचा उपसा केला. त्यामुळे शेवटच्या घटका मोजत असलेल्या या तलावाला जीवनदान मिळाल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर शहरातील पालिकेच्या शाळा क्रमांक दोन लगत असलेला गाव तलाव या भागातील जलपातळी वाढविणारा एकमेव घटक आहे. सन १९७२ च्या काळात डॉ. संजीव वार्डेकर हे नगराध्यक्ष असतानाचे काळात तलावाला भरपूर पाणी असायचे, त्याकाळात तलाव शहराचे वैभव बनला होता. तलावातील जलभरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरी व बोअरवेलची जलपातळी भरपूर प्रमाणात वाढत चालली होती. नंतरच्या काळात मात्र तलावाकडे जणू सर्वांंचेच दुर्लक्ष होत राहिले. त्यामुळे तलावाचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. अनेकांना मनोमन वाटूनही त्यांना काही करता येत नव्हते. त्यामुळे हा तलाव कायमचा नाहीसा तर होणार नाही अशी चिंता सर्वसामान्यांना सतावत होती. अशातच समाजसेवक सचिन कुळकर्णी यांच्या पुढाकारातून या तलावाच्या जीवदान अभियानाला सुरुवात करण्यात आली, जलपुनर्भरणासाठी नावाने हे अभियान राबविण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे देवेंद्र पाटील, दीपक लोहिया, बबलू गावंडे, विवेक चव्हाण, डॉ. बियाणी, सतीश रत्नपारखी, दिनेश राठोड, आत्माराम चव्हाण, मनोज इंगोले, प्रा. अरुण इंगळे, प्रा. वीरेंद्रसिंह ठाकूर याच्यासह मान्यवरांनी सहभाग घेऊन जल चळवळीला गाठ उपशाचे काम गेले आठ ते दहा दिवसांपासून अविरत सुरू आहे. जवळपास हजारो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला असून, दोन टिप्पर व पाच ट्रॅक्टरच्या माध्यमातून अहोरात्र गाळाचा उपसा सुरू आहे. तलावाच्या पुनर्भरणासाठी मदतीचे अनेक हात पुढे सरसावत असल्याने काम करणार्‍यांनाचा उत्साहसुद्धा वाढत चालला आहे.