वाशिम : विविध संकटांमधून वाटचाल करणार्या शेतकर्यांसमोर आता पिकांना वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाअभावी अनेक भागातील पिके करपून जात असल्याने आणि वीजपुरवठाही अनियमित राहत असल्याने पिकांना वाचवावे कसे? या चिंतेने शेतकर्यांची झोप उडाली आहे. मागील १0-१२ दिवसांपासूनच्या पावसाच्या उघडीपीमुळे व त्यात भरीस भर वाढत्या तापमानामुळे परिसरातील खरीपाची हिरवी उभी पिके करपूर चालली आहेत. येत्या चार पाच दिवसात वरुनराजा बरसला नाही तर बळीराजाच्या हिरव्या स्वप्नांच्या चुराडा होईल, यात शंका नाही. खरिपाच्या सुरुवातीपासनच निसर्गाचा लहरीपणा व संकटाची साडेसाती बळीराजाला भोवली आहे. आतापर्यंंत पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्यांना हजारो रुपये खर्च करावा लागला. आता सर्व मदार रोगराईतून वाचलेल्या पिकांच्या उत्पादनावर होती. मात्र मागील दहा दिवसांच्या पावसाच्या उघडीपीने बळीराजाची झोप उडाली आहे.
पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर!
By admin | Updated: September 26, 2014 00:30 IST