उंबर्डाबाजार : गतवर्षी चांगला पाऊस पडला असला तरी, यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे पशूंच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पशूपालकांनी जनावरे विक्रीस काढली आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायासाठी गायी , म्हशी पाळत असतात, परंत चाराटंचाई व खर्चाच्या तुलनेत दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र उंबर्डा बाजार परिसरात पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पादनातून आपला दैनंदीन खर्च भागवितात, मात्र सध्या गाई, म्हशीच्या किमती ३० हजारापासून एक लाखाच्या वर जावून पोहोचल्या आहेत.
चा-याअभावी पशूधनात घट
By admin | Updated: May 27, 2017 19:42 IST