मंगरुळपीर : तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी त्वरीत उपाय योजना राबविण्याला प्राधान्य दय़ाव,े ज्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्या ठिकानी विहीर अधिग्रहन करून किंवा टॅकरव्दारे पाणी पुरवठा करावा, जनावरांसाठी अनुदानावर चारा डेपो सुरू करावे तसेच ज्या भागात पेरण्या उलटल्या आहेत त्या परिसरातील शेतीचे तलाठी अथवा कृषी सहाय्यकाच्या वतीने सर्व्हेक्षण करावे अश्या सुचना जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकर १२ जुलैला पार पडलेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती भाष्कर पाटील शेगीकर होते. मंगरूळपीर तालुक्यावर यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. तालुक्यातील काही शेतकर्यांनी मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेला पावसात पेरण्या उरकुन घेतल्या. मात्र त्यानंतर अचानक पावसाने दडी मारली. पाऊस गायब झाल्यामुळे पेरलेली पिके करपू लागली. परिणामी, शेतकर्यांवर दुबार पेरणीची पाळी ओढविली आहे. अश्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासानाकडुन आर्थिक मदत मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. परंतु तत्पूर्वी तहसिल व कृषी विभागाच्या प्रशासनाने उलटलेल्या पेरण्यांचे सर्व्हेक्षण सुरू करावे अश्या सुचना ठाकरे यांनी बैठकीत केल्या. शिवाय तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. त्याकरिता विनाविलंब उपाय योजना करण्या संदर्भातही त्यांनी सुचित केले. सदर आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, तहसिलदार बळवंत अरखराव, पंचायत समितीच्या उपसभापती जयङ्म्री कातडे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश जाधव, अशोकराव खराबे,शंकरराव सावके, शिवदास पाटील, विश्वास गोदमले, रजनीताई ताटके, पंचायत समिती सदस्य सुभाष शिंदे, विलास लांभाडे, संतोष इंगळे, आमटे, शेरूभाई फकिरावाले, संतोष भगत,देवराव डहाणे,रवि चव्हाण, रफीकाबी युनूस खान, मनवर आदी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या सरपंच व उपसरपंचानीही विविध विषयावरील शंका अधिकार्यांसमोर उपस्थित केल्या. बैठकीत उपविभागीय अधिकारी काळे यांनी चारा व पाणी टंचाई संदर्भात आढावा घेतला. गाव निहाय पाणी टंचाई बाबत नादुरूस्त हातपंप, विहीरीची गाव निहाय माहीती घेतल्यानंतर पाणी टंचाई निवारण्या संदर्भात ग्राम पंचायतीने उपाय योजना राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करावे व ग्रामसेवक संपावर असल्यामुळे रोजगार सेवकांची मदत घ्यावी सदर प्रस्ताव पंचायत समितीला सादर करावे. ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रलंबीत शेतकर्यांना सिंचन विहीरीचे देयके देण्यासाठी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन अधिकार्यांनी केले. पाणी टंचाई बाबत कामचुकार पणा करणार्या कर्मचार्यांची गय केल्या जाणार नसल्याचा इशारा यावेळी उपविभागीय अधिकारी दिनकर काळे यांनी दिला.
दुबार पेरणी, चारा व पाणी टंचाई बाबत उपाययोजना
By admin | Updated: July 13, 2014 22:44 IST