लोकमत न्यूज नेटवर्कदगड उमरा: वेगवेगळय़ा नैसर्गिक संकटांनी शेतकरी आधीच अडचणीत आला असताना आता त्यात पिकांवरील रोगांची भर पडली आहे. दगड उमरा परिसरातील फाळेगाव थेट शिवारात तुरीच्या पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला असून, उभे पिक सुकत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या संदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट शिवारात यंदा मोठय़ा प्रमाणात तूर आणि सोयाबीनची पेरणी शेतकर्यांनी केली आहे. तथापि, पावसाअभावी सोयाबीनचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही, तर अनेकांच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. दरम्यान, पावसाअभावी तुरीचे पिकही सुकण्याच्या मार्गावर असताना गत आठवड्यात आलेल्या पावसामुळे तूर आणि कपाशीला मोठा आधार मिळाला. ही पिके पुन्हा बहरून डोलू लागल्याने उत्पन्न चांगले होणार असल्याच्या आशेने शेतकर्यांचे चेहरे उजळले; परंतु त्यांचा हा आनंदही निसर्ग हिरावून घेत असल्याचे दिसत असून, आता या परिसरात तुरीच्या पिकावर बुरशीजन्य मर रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे तुरीचे हिरवेगार पिक सुकत चालले असून, यावर उपाय तरी काय करावा, याचा विचार शेतकरी करीत आहेत. याच शिवारामधील जयाजी लहानू नवघरे आणि महादेव नवघरे यांच्या जवळपास पाच एकराहून अधिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक तूर बुरशीजन्य मर रोगामुळे मुळापासूनच सुकली आहे. त्यामुळे या शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने परिसरातील तूर पिकाची तात्काळ पाहणी करून शेतकर्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.
मर रोगामुळे तुरीचे पीक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:10 IST
दगड उमरा: वेगवेगळय़ा नैसर्गिक संकटांनी शेतकरी आधीच अडचणीत आला असताना आता त्यात पिकांवरील रोगांची भर पडली आहे. दगड उमरा परिसरातील फाळेगाव थेट शिवारात तुरीच्या पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला असून, उभे पिक सुकत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या संदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
मर रोगामुळे तुरीचे पीक संकटात
ठळक मुद्देदगड उमरा परिसरातील चित्र कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज