शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यानेच झाली महिलेची प्रसूती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:25 IST

रिसोड: तालुक्यातील मांडवा येथील शालू नारायण राठोड ही  गर्भवती महिला आपल्या पतीसोबत विजयादशमीच्या दिवशी  ३0 सप्टेंबरला रिसोडकडे येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती  होऊन तिने गोंडस मुलीला जन्म दिला. योगायोगाने याचदरम्यान  कुर्‍हा येथे रुग्णास सोडण्याकरिता आलेल्या शासकीय  रुग्णवाहिकेमुळे सदर महिलेस वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करणे शक्य झाल्याने पुढील अनर्थ टळला. 

ठळक मुद्देआई व बाळ सुखरूप भरजहाँगीर येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील मांडवा येथील शालू नारायण राठोड ही  गर्भवती महिला आपल्या पतीसोबत विजयादशमीच्या दिवशी  ३0 सप्टेंबरला रिसोडकडे येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती  होऊन तिने गोंडस मुलीला जन्म दिला. योगायोगाने याचदरम्यान  कुर्‍हा येथे रुग्णास सोडण्याकरिता आलेल्या शासकीय  रुग्णवाहिकेमुळे सदर महिलेस वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करणे शक्य झाल्याने पुढील अनर्थ टळला. मांडवा येथील शालू राठोड ही महिला आपल्या पतीसोबत  शनिवारी रिसोडकडे येत होती. मात्र, यादरम्यान रस्त्यातच तिला  प्रसूती वेदना सुरू होऊन तिने मुलीला जन्म दिला. सदर घटनेची  माहिती मिळताच भर येथील महादेव घुगे, सामाजिक कार्यकर्त्या  लता कांबळे, संतोष तालखेडकर, प्रदीप गरकळ, डॉ.सुरेश  गटकळ, सुदाम जुमडे यांनी पुढाकार घेत, खासगी ऑटोची  व्यवस्था करून सदर महिलेस रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयात  हलविले. मात्र, याचदरम्यान योगायोगाने रिसोड ग्रामीण  रुग्णालयाची रुग्णवाहिका कुर्‍हा येथे जात असताना ती थांबवून  सदर महिलेस त्याव्दारे तडकाफडकी रिसोड ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी पाठविण्यात आले.