शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेंतर्गत उघड्यावर जाणार्‍यांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:18 IST

वाशिम : जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ या अभिनव मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, उघड्यावर शौचास जाणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार, २४ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा, अरक, मानोली आणि सायखेडा या गावातील २१ लोकांना पकडून त्यांच्याकडून १९ हजार रुपये रोख स्वरुपात ‘ऑन दि स्पॉट’ दंड वसूल करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे यांच्या नेतृत्वात तद्वतच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे२१ लोकांकडून १९ हजारांचा दंड वसूल स्वच्छता मिशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ या अभिनव मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, उघड्यावर शौचास जाणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार, २४ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा, अरक, मानोली आणि सायखेडा या गावातील २१ लोकांना पकडून त्यांच्याकडून १९ हजार रुपये रोख स्वरुपात ‘ऑन दि स्पॉट’ दंड वसूल करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे यांच्या नेतृत्वात तद्वतच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत जि. प. आणि पं. स. च्या गुड मॉनिर्ंग पथकाने २४ सप्टेंबरला पहाटे ४.३0 वाजताच्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा येथील हगणदरी गाठली. यावेळी उघड्यावर शौचास जाणार्‍या ९ व्यक्तींना पकडण्यात आले. त्यापैकी आठ लोकांनी प्रत्येकी १२00 रुपये दंड ‘ऑन दि स्पॉट’ भरला. मात्र, मनोहर आकाराम खाडे नामक व्यक्तीने दंड न भरल्यामुळे त्यांची मंगरुळपीर पोलीस स्टेशनला नोंद घेऊन दोन दिवसांची मुदत देऊन सोडून देण्यात आले. अरक येथील पाच लोकांना पकडल्यानंतर चार लोकांनी प्रत्येकी १२00 रुपये दंड भरला; तर या गावातील शीलाबाई रमेश निकम या महिलेने दंड भरण्यास नकार दिला. शीलाबाई व रमेश या दोघांनी पथकासोबत हुज्जत घालून पोलिसांना बोलावल्यावर घरातून पळ काढला. त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे निर्देश ग्रामपंचायतला देण्यात आले आहेत. यानंतर मानोली येथील दोन लोकांना पथकातील अधिकार्‍यांनी पकडले होते. दोघांनीही दंड भरुन आपली सुटका करुन घेतली. 

सांसद आदर्श गावात पाच व्यक्तींवर कारवाई!हगणदरीमुक्त आणि सांसद आदर्श गावाच्या यादीत समाविष्ट असणार्‍या सायखेडा या गावातील हगणदरी मात्र आजही सुरुच असल्याची धक्कादायक बाब पथकाच्या निदर्शनास आली. याठिकाणी पाच व्यक्तींना २४ सप्टेंबरला उघड्यावर जाताना पकडण्यात आले. त्यापैकी सखाराम जाधव, सुनील जाधव आणि नागोराव गहुले यांनी ‘ऑन दि स्पॉट’ दंड भरल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.