शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी ५00 घरकुलांचे प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: August 28, 2014 02:25 IST

वाशिम तालुक्यातील ५00 घरकुल पात्र लाभार्थींचे घरकुल बांधकाम अजूनही जागेअभावी प्रलंबित .

पांडवउमरा : वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींनी घरकुल पात्र लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली आहे. त्यामधील ५00 घरकुल पात्र लाभार्थींचे घरकुल बांधकाम अजूनही जागेअभावी प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. जागेअभावी पात्र लाभार्थी घरकुल बांधकामापासून वंचित राहत आहेत.शासकीय जागेवर गत १२ ते १५ वर्षांपासून वास्तव्य करणार्‍या लाभार्थींना आठ अ मिळणे अपेक्षीत आहे. मात्र, संबंधीत लाभार्थ्यांना आठ अ मिळणे अवघड झाले आहे. दरम्यान जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी १५ जुलै २0१४ रोजी तहसील कार्यालय वाशिम येथे सावंगा जहॉगीर, पार्डी टकमोर, बिटोडा, जांभरुण महाली या गावातील घरकुल पात्र लाभार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. १८ जुलै २0१४ रोजी तहसीलदार वाशिम यांनी लेखी आश्‍वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. सदरचा प्रश्न हा पार्डी टकमोर पं.स. सर्कलमधील लाभार्थ्यांसह वाशिम पं. स. अंतर्गत येणार्‍या ८४ ग्रामपंचायती मधील घरकुल पात्र लाभार्थ्यांचा असून तालुक्यातील प्रतिक्षा यादीनूसार जे लाभार्थी इंदिरा आवास, रमाई आवास घरकुल योजनेस पात्र आहेत. परंतु स्वत:च्या मालकीची जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांंचे प्रस्ताव सचिवाकडून बोलावून गटविकास अधिकार्‍यांनी महसुल विभागाला सादर करावे, लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी वाशिम पंचायत समितीच्या माजी सभापती मधूबाला सुभाषराव चौधरी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. घरकुल लाभार्थ्यांंना त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची जागा नसल्यामुळे थोडी अडचण येत आहे. याविषयी लवकरच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन सदर लाभार्थ्यांंचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांनी सांगीतले.