शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उर्जामंत्र्यांच्या दौरा घोषणेमुळे विज उपकेंद्राच्या कामाला वेग

By admin | Updated: May 2, 2017 19:13 IST

शिरपूर जैन: उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे जिल्हा दौऱ्यावर येण्याची घोषणा झाल्यामुळे, मालेगाव तालुक्यातील खंडाळा विज उपकेंद्राच्या कामाला वेग आला आहे.

शिरपूर जैन: राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे येत्या ११ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येण्याची घोषणा झाल्यामुळे मालेगाव तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या खंडाळा विज उपकेंद्राच्या कामाला वेग आला आहे. उर्जामंत्र्यांच्या हस्तेच या ३३ केव्ही विजउपकें द्राचे लोकापर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन, खंडाळा, वाघी बु., वाघी खु. कोठा, ढोरखेडा, बोराळा, करंजी, वसारी, तिवळी, दुधाळा, घाटा, मिर्झापूर, पांगरखेडा, दापुरी, दापुरी-कालवे, शेलगाव खवणे, या गावांच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पुरेसा विज पुरवठा होत नसे. सततचे भारनियमन आणि कमी अधिक दाबामुळे विज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचन करणेच कठीण झाले होते. या पृष्ठभूमीवर खंडाळा येथे ३३ केव्हीचे विज उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता भासू लागली आणि २०१२ मध्ये शिरपूर ग्रामपंचायतने आसेगाव मार्गावरील ई-क्लास जमिनही उपलब्ध करून दिली. त्यानंतर २०१३ च्या अखेरीस उपकेंद्राचे कामही सुरू झाले; परंतु हे काम संथगतीने होत असल्याने तीन वर्षांच्या काळातही पूर्ण झाले नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आॅक्टोबर २०१६ ला नागपूर येथील विज वितरणचे उच्च अधिकारी रेश्मे, वाशिम येथील कार्यकारी अभियंता मेश्राम, मालेगाव येथील उपविभागीय अभियंता राजेंद्र चव्हाण, यांनी उपकेंद्राची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी डिसेंबर २०१६ ला विज उपकेंद्र कार्यान्वित करण्याचा विश्वास दिला; परंतु अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. सद्यस्थितीत ११ केव्ही लाईन ओढणे, ८ फिडर जोडणे व इतर लहानसहान कामे बाकी आहेत. अशातच ११ मे रोजी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्तेच या विज उपकेंद्राचे लोकार्पण होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या विज उपकेंद्राच्या कामाला वेग दिला आहे.