शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची घोषणा उशिरा; शेतक-यांचे २१ लाखांचे नुकसान

By admin | Updated: April 14, 2016 01:41 IST

शेतक-यांनी भरले ६२.७१ लाखांचे शुल्क: सूटपरत मिळेल काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

संतोष वानखडे /वाशिम५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये कृषीपंपाच्या शुल्कात ३३.५ टक्के सूट दिली जाते. दुष्काळाची घोषणा उशिरा झाल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कृषीपंपधारक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. कृषीपंप शुल्कापोटी एप्रिल ते डिसेंबर २0१५ पर्यंत शेतकर्‍यांनी ६२ लाख ७१ हजार रुपये महावितरणकडे जमा केले. यापैकी ३३.५ टक्के सूट म्हणून २१ लाख रुपये संबंधित कृषीपंपधारक शेतकर्‍यांना परत मिळणे अपेक्षित आहे.वाशिम जिल्ह्यातील सर्व गावांची सन २0१५-१६ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आल्याने शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना जमीन महसुलात सूट, कृषीपंप वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी सवलतींचा समावेश आहे. २0१५ या वर्षात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन झाले नाही. अनेक शेतकर्‍यांचा शेतीतील लागवड खर्चही वसूल झाला नाही. रब्बी हंगामात सिंचन व कृषीपंप जोडणीची सुविधा असणार्‍या ४६ हजार ९५७ शेतकर्‍यांनी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. विद्युत वापरापोटी या शेतकर्‍यांना डिसेंबर २0१५ अखेर १४ कोटी ७0 लाख ९६ हजार रुपयांचे विद्युत देयक आकारण्यात आले. यापैकी ६२ लाख ७१ हजार रुपयांच्या शुल्काचा भरणा करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने कृषीपंप वीज देयकात ३३.५ टक्के सूट मिळणे आवश्यक आहे. ज्यांनी वीज देयकाचा भरणा केला नाही, अशा शेतकर्‍यांना ही सूट मिळणार आहे; मात्र ज्यांनी वीज देयकाचा भरणा केला आहे, अशा शेतकर्‍यांना भरलेल्या देयकातून ३३.५ टक्के रक्कम परत मिळेल काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.