शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त

By admin | Updated: March 7, 2016 02:18 IST

शेतकरी हवालदिल: १५.२२ कोटींच्या अनुदान रकमेची शेतक-यांना प्रतीक्षा.

वाशिम: ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे जवळपास ९७00 शेतक-यांचे १५.२२ कोटी रुपयांचे अनुदान एका वर्षानंतरही शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने रोष व्यक्त होत आहे.शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनेंतर्गतच्या अनुदानातून शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकर्‍यांची निवड केली जाते. २0१४-१५ या वर्षात वाशिम जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यामध्ये मानोरा तालुक्यातील ८३0 शेतकर्‍यांचा समावेश आहे. या सर्व पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत मिळणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल एका वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. अवर्षण, अतवृष्टी, गारपीट आणि अनियमित पाऊस यामुळे आधीच अवर्षण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अनुदानाअभावी सिंचन सुविधा उपलब्ध करणे कठीण होऊन बसले आहे. ठिबक व तुषार संचासाठी जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी गतवर्षी ऑनलाइन अर्ज केले होते. २0१५-१६ हे आर्थिक वर्ष संपत असतानाही शेतकर्‍यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अगोदरच तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. अशातच शासनही अनुदानाची रक्कम देत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडत आहे. दरम्यान, ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे अनुदान शेतकर्‍यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून माजी जिल्हा परिषद सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे व भारिप-बमसंचे नेते युसूफ पुंजानी यांनी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन दिले. मानोरा तालुका व जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असतानाच, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाने शेतकर्‍यांना हवालदिल केले आहे. कमी पावसातही शेतकरी तुषार किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेती ओलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अनुदान मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचा आरोप हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी केला. मानोरा तालुक्यातील लाभार्थींंनी उसणवारीवर सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. आता सिंचन साहित्याचे अनुदान मिळत नसल्याने उसणवारीची परतफेड कशी करावी? या प्रश्नाने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. शासनकर्त्यांंनी शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी दिला.