शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्त्यांच्या कामांना ‘ठेंगा’

By admin | Updated: October 27, 2014 01:08 IST

आढावा बैठका ठप्प : वाशिम जिल्हाधिका-यांचे आदेशही बासनात.

वाशिम : २00४-0५ पासून प्रलंबित असलेल्या दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत असलेल्या कामांना पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासन केवळ ह्यठेंगाह्णच दाखविण्याचे काम करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रारंभी आढावा बैठका घेणार्‍या प्रशासनाने गत पाच-सहा महिन्यांपासून प्रलंबित कामांचा आढावाही घेतला नसल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. दलित वस्त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निघालेल्या शासनाला त्यांच्याच प्रशासनातील काही महाभाग मागे ओढत असल्याचे धक्कादायक वास्तव सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पडघान यांनी माहिती अधिकारातून समोर आणले होते. दलित वस्त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विविध कामांसाठी लाखो रुपयांचा निधी शासनस्तरावरून उपलब्ध करून दिला जातो. हा निधी इतरत्र न वळविण्याचे बंधनही टाकण्यात आले आहे. दलित वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, पाणीपुरवठय़ाची सुविधा म्हणून विहीर आणि पाइप लाइन टाकणे तसेच पाण्याची टाकी बांधणे, हातपंप घेणे, समाजमंदिर बांधणे आदी कामे करण्यासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते. निधीही तत्काळ उपलब्ध करून दिला जातो. मात्र, कामाला विलंबाने सुरुवात होणे, शिवाय तीन-चार वर्षातही सदर काम पूर्णत्वाकडे जाईलच, याची कोणतीही शाश्‍वती नसते. वाशिम तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत गत १0 वर्षात किती कामे मंजूर झाली, एकूण निधी किती आणि खर्च किती, कामाची स्थिती काय, याबाबत राजकुमार पडघान यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितली होती. या माहितीनुसार, २00४-0५ मध्ये एकूण २७ ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठय़ाची कामे मंजूर झाली होती. विहीर, पाइप लाइन, बोअर, पाणी टाकी आदी कामांसाठी लाखो रुपयांचा निधीही देण्यात आलेला आहे. तरीही १२ ग्रामपंचायतींमधील दलित वस्त्यांमध्ये नळ योजनेचे पाणी पोहोचू शकले नसल्याची शोकांतिका आहे.