शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

कर्जमाफीच्या अर्ज प्रक्रियेस ‘सर्व्हर डाउन’चा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:12 IST

वाशिम: विद्यमान शासनाने अधिकांश योजना ‘ऑनलाइन’ करून  पारदश्री कारभाराचा निर्धार केला; मात्र योजनांतर्गत अर्ज भरताना  सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडत असून एकाचवेळी अतिरिक्त  ताण येत असल्याने ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या वाढीस लागली आहे.  परिणामी, प्रशासकीय कामे सुसह्य होण्याऐवजी असह्य होत आहेत.  पीकविमा अर्ज प्रक्रियेतील अडथळ्यानंतर आता कर्जमाफी  प्रक्रियेलाही त्याचा मोठा फटका बसत असून, यामुळे शेतकरी त्रस्त  झाले आहेत. 

ठळक मुद्देशेतकरी त्रस्तमहा-ई सेवा केंद्र, ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विद्यमान शासनाने अधिकांश योजना ‘ऑनलाइन’ करून  पारदश्री कारभाराचा निर्धार केला; मात्र योजनांतर्गत अर्ज भरताना  सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडत असून एकाचवेळी अतिरिक्त  ताण येत असल्याने ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या वाढीस लागली आहे.  परिणामी, प्रशासकीय कामे सुसह्य होण्याऐवजी असह्य होत आहेत.  पीकविमा अर्ज प्रक्रियेतील अडथळ्यानंतर आता कर्जमाफी  प्रक्रियेलाही त्याचा मोठा फटका बसत असून, यामुळे शेतकरी त्रस्त  झाले आहेत. महा-ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत संपूर्ण राज्यात  ‘ऑनलाईन’ कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. वास् तविक पाहता या बदललेल्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांची कामे वेळेत  होणार असून त्यात कुठलाही गैरप्रकार होणार नाही, याची योग्य ती  सोय करण्यात आली आहे; परंतु योजनांतर्गत लाभ घेण्याकरिता  पुरेशी मुदत देऊनही लाभार्थींकडून अगदी शेवटच्या काही  दिवसांमध्येच अर्ज सादर करण्यासाठी धावपळ केली जात असल्याने  संगणकीय कार्यप्रणालीवर अतिरिक्त ताण येवून ‘नेट कनेक्टिव्हिटी’  गायब होणे, ‘सर्व्हर डाऊन’ होऊन संपूर्ण ‘ऑनलाइन’ यंत्रणा बंद  पडण्याचा प्रकार घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा  लागत आहे. 

पीक विम्याचे अर्ज भरल्या गेले ‘ऑफलाइन’!पीकविमा अर्ज ‘ऑनलाइन’ सादर करण्यासाठी शासनाकडून पुरेशी  मुदत देण्यात आली होती; मात्र ३१ जुलैपर्यंत फारच कमी प्रमाणात  अर्ज सादर झाले. त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.  यादरम्यान ४ ऑगस्टला जिल्ह्यातील सर्वच महा-ई सेवा केंद्र आणि  आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकर्‍यांची तोबा गर्दी झाली; मात्र  अशातच ऑनलाइन कार्यप्रणालीचे ‘सर्व्हर डाऊन’ होऊन रात्री  उशिरापर्यंतही ते पुर्ववत झाले नाही. शेवटच्या दिवशी ५ ऑगस्टलाही  हाच प्रकार कायम राहिल्याने शेवटी पीकविम्याचे अर्ज ‘ऑफलाइन’  स्वीकारण्यात आले. 

एकाचवेळी अनेक कामे ‘ऑनलाइन’ करीत असताना संगणकीय  कार्यप्रणाली प्रभावित होणारच. त्यामुळे ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या  उद्भवून सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन  कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीची प्र तीक्षा न करता जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आतापासूनच गर्दी न करता  टप्प्याटप्प्याने आपले अर्ज ‘ऑनलाइन’ सादर करून वेळेवर होणारी  गैरसोय टाळायला हवी. - भगवंत कुलकर्णीजिल्हा व्यवस्थापक, आपले सरकार सेवा केंद्र