लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त ९ ते १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण विषयी जनजगृती करण्यात येत असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुका विधी सेवा समितीमार्फत ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ राबविली जात आहे. वाशिम शहरातील बसस्थानक, बागवानपुरा, गवळीपुरा आदी ठिकाणी जिल्हा वकील संघ, विधी सेवा प्राधिकरण पॅनेलवरील वकील व विधी स्वयंसेवक यांनी नागरिकांना घरोघरी जाऊन विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती दिली व त्यांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात विधी सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले असून येथे विधी स्वयंसेवक व नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच शहरातील पोलीस स्टेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय, पंचायत समिती, जिल्हा कारागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आदी महत्त्वाच्या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणविषयी सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती देण्यासाठी ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 19:11 IST
विविध उपक्रमांच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण विषयी जनजगृती करण्यात येत असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुका विधी सेवा समितीमार्फत ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ राबविली जात आहे.
विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती देण्यासाठी ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ !
ठळक मुद्देवाशिम तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम जनजागृतीचा प्रयत्न