शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका; क्षणात बॅंकखाते होऊ शकते साफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST

वाशिम : अनोळखी माणसाने कॉलसाठी मोबाइल मागितल्यास देऊ नका ! या माध्यमातून ओटीपी मिळवून बॅंक खात्यातील जमा रक्कम क्षणात ...

वाशिम : अनोळखी माणसाने कॉलसाठी मोबाइल मागितल्यास देऊ नका ! या माध्यमातून ओटीपी मिळवून बॅंक खात्यातील जमा रक्कम क्षणात गायब केली जाऊ शकते. अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

आजघडीला जवळपास प्रत्येकाकडेच ॲन्ड्राॅइड मोबाइल असून, दहा अंकी मोबाइल क्रमांक बॅंक खात्याशी जोडलेला आहे. ऑनलाइन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करायची असल्यास खबरदारी म्हणून ओटीपी मागविण्यात येतो. तो कोणालाही ‘शेअर’ करू नये, असे आवाहन वारंवार केले जाते. त्यामुळे कुठल्याही अनोळखी माणसाच्या हातात मोबाइल दिल्यास तुमची नजर चुकवून तो व्यक्ती क्षणात बॅंकखाते साफ करू शकतो. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.

.......................

ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक

कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन -

अनोळखी व्यक्ती कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन आणि तत्काळ ओटीपी मिळवून बॅंकेतील रकमेवर डल्ला मारू शकते.

लॉटरी लागली आहे असे सांगून -

तुम्हाला अमूक रकमेची लॉटरी लागली आहे आणि त्यासाठी ओटीपी सांगा, अशी बतावणी करून फसवणूक होऊ शकते.

वेगळी लिंक पाठवून -

तुमच्या मोबाइलवर मॅसेजद्वारे वेगळी लिंक पाठवून पैशाचे आमिष दाखविले जाऊ शकते. त्याद्वारे ओटीपीची मागणी होऊ शकते.

केवायसीसाठी आवश्यक असे सांगून -

बॅंक अधिकाऱ्याच्या नावाने फोन करून केवायसीसाठी ओटीपी आवश्यक असल्याची बतावणी होऊ शकते.

............

ही घ्या काळजी

१) आपला ओटीपी कोणतीही बॅंक किंवा शासकीय अधिकारी कधीच मागत नाही. त्यामुळे ओटीपीसाठी कोणी काहीही कारण सांगतले तर तो कोणालाच शेअर करू नये.

२) एखादी अडचणीत असलेली अनोळखी व्यक्ती फोन लावण्यासाठी मोबाइल मागत असेल तर त्याच्या प्रत्येक हालचालीवर पूर्णत: लक्ष ठेवायला हवे.

३) बॅंकेतील रकमेवर वक्रदृष्टी ठेवून असलेले ठग लाखो रुपयांचे आमिष दाखवून बॅंक डिटेल्स, ओटीपीची मागणी करतात. अशावेळी त्यांना प्रतिसाद देऊ नये.

...................

कोट :

मोबाइलच्या माध्यमातून भोळ्याभाबड्या लोकांना गंडविले जात आहे. सोशल मीडिया तसेच विविध प्रकारच्या लिंकच्या माध्यमातूनही बँकेतील रक्कम हडपल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाइलचा गैरवापर होणार नाही, याकडे प्रत्येकाने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.

- अजयकुमार वाढवे, सहायक पोलीस निरीक्षक