शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

वाशिम जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांकडे २१ कोटींची थकबाकी!

By admin | Updated: February 18, 2017 03:18 IST

महावितरण आर्थिकदृष्ट्या तोट्यात ; वसूलीकडे दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांच्या फेब्रूवारीच्या पगारीवर येणार गंडांतर

सुनील काकडे वाशिम, दि. १७- जिल्ह्यातील महावितरणच्या ग्राहकांकडे २१ कोटी ३२ लाख रुपये थकबाकी आहे. यासह गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली कृषीपंपाची रक्कमही २६४ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या तोट्यात सापडले असून वाट्टेल ते करा; पण घरगुती ग्राहकांकडील थकबाकी प्राधान्याने वसूल करा, अन्यथा फेब्रूवारी महिण्याचा पगार कपात केला जाईल, असा सज्जड दम वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या अधिपत्याखालील कर्मचार्‍यांना भरल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात महावितरणचे ९ हजार ४७२ थकबाकीदार ग्राहक असून त्यांच्याकडे ५ कोटी ५४ लाख ६३ हजार रुपये थकबाकी आहे. मालेगाव तालुक्यात ९ हजार ५१५ ग्राहकांकडे ४ कोटी १४ लाख ५0 हजार, रिसोड तालुक्यात ८ हजार ५९८ ग्राहकांकडे ३ कोटी ९९ लाख १५ हजार, मंगरूळपीर तालुक्यात ५ हजार ३१२ ग्राहकांकडे २ कोटी २३ लाख ३९ हजार, मानोरा तालुक्यात ८ हजार २३२ ग्राहकांकडे २ कोटी १ लाख ४८ हजार; तर कारंजा तालुक्यातील ७ हजार ६३९ ग्राहकांकडे ३ कोटी ३९ लाख ७६ हजार, यानुसार ४८ हजार ७६८ थकबाकीदार ग्राहकांकडे २१ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी महावितरणने विशेष सवलत देवून अंमलात आणलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ घेत गेल्या चार महिण्यांत सुमारे ३00 ग्राहकांनी ११ लाख रुपयांची थकबाकी अदा केली आहे. मात्र, ही वसूल झालेली रक्कम अगदीच कमी असून उर्वरित ग्राहकांकडील २१ कोटी २२ लाख रुपये थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे. वाशिम जिल्ह्यात वाढत चालेली थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व अभियंते, जनमित्रांना पत्र देण्यात आले असून जे ग्राहक थकबाकी अदा करण्यास टाळाटाळ करतील, त्यांचा वीजपुरवठा विनाविलंब खंडित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांसोबतच कामाकडे दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांचीही हयगय केली जाणार नाही.विजय मेश्रामकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम