शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

डॉक्टरच्या मानवतावादी विचाराने ‘कळी’ला आधार!

By admin | Updated: September 3, 2016 02:03 IST

माता-पिता आनंदित; कारंजातील बरडिया दाम्पत्याने घेतले बालिकेला दत्तक.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. २: आधीच पोटी दोन मुली आणि घरची परिस्थिती बेताची अशा स्थितीत तिसर्‍यांदा १२ वर्षांनंतर गर्भधारणा झाली. दोन अपत्येच सांभाळणे कठीण असल्याने तिसरे अपत्य नको, म्हणून गर्भपात करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेस धीर देत गर्भ वाढविण्याची सूचना केली आणि त्या महिलेने एका कन्येला जन्म दिल्यानंतर त्या कन्येसाठी आधारही शोधण्याचे मानवतावादी कार्य यवतमाळ जिल्ह्यातील शोभा सुराणा या स्त्रीरोग आणि प्रसूति तज्ज्ञांनी केले. कारंजा येथील निर्मल आणि मिना बरडिया या दाम्पत्याने त्या कन्येचा स्वीकार करून डॉ. सुराणा यांचे मानवतावादी कार्य तडीस नेण्यास मोठा हातभार लावला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे डॉ. शोभा सुराणा या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत असतानाच डॉक्टर या नात्याने त्यांनी मानवतावादी विचारांची जपणूक नेहमीच केली आहे. एक दिवस त्यांच्याकडे वणी तालुक्यातीलच एक महिला आली. त्या महिलेला दोन मुली होत्या. लहान मुलगी १२ वर्षाची असताना त्या महिलेला गर्भधारणा झाली. त्या गर्भाची चांगली सोय घेऊन तो वाढविण्याची सूचना केली आणि त्यासाठी त्यांना सहकार्यही केले, एवढेच नव्हे, तर सदर महिला प्रसूत झाल्यानंतर त्या बाळाला आधार कसा द्यायचा, हा विचारही डॉ. सुराणा यांनी करून ठेवला होता. या महिलेची प्रसूति ६ ऑगस्ट रोजी झाली आणि तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. डॉ. सुराणा यांनी लगेचच ही माहिती त्यांच्या एका नातेवाइकांमार्फत कारंजा येथील बरडिया दाम्पत्यापर्यंंत पोहोचविली आणि कन्येला दत्तक घेण्याची तयारी आहे की नाही, त्याची शहानिशा केली. कारंजा येथील व्यापारी निर्मल बरडिया यांना मुलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी पत्नीशी चर्चा करून त्याला संमती दर्शविली आणि सदर कन्येस माता-पित्यांच्या हस्ते रितसर दत्तकविधान करून घरी आणले. सद्य:स्थितीत ही कन्या २८ दिवसांची असून, मिना सुराणा या तिची आई या नात्याने उत्तम काळजी घेत आहेत. डॉ. शोभा सुराणा यांच्या मानवतावादी विचारामुळे एका खुडल्या जाणार्‍या कळीचे जीवन वाचलेच, शिवाय तिला आधार म्हणून एक चांगले घरही मिळाले.