वाशिम: पावसाअभावी दुबार पेरणी करणार्या शेतकर्यांच्या शेतीचे सर्व्हेक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. उलटलेल्या पेरण्यांचे सर्व्हेक्षणासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले होते. २ जून ते १२ जून दरम्यान वारा व अनसिंग परिसरामध्ये दमदार पाउस झाल्याने पेरण्या झाल्या परंतु पेरण्या झाल्या पासून पावसाने हुलकावणी दिल्याणे सर्व पिके वाळून गेलीतत्यामुळे देपूळ वारा उमरा शम पार्डी उमरा कापसे, बोरी, धानोरा, मापारी, कानडी, देगाव, जवळा एकांबा, ईलखी, अनसिंग, पिंपळगाव, खडसिंग शेलू घोटा, सोंडा सावळी सापळी जयपूर झोडगा वाई टणका इत्यादी गावाची पेरलेली पिके वाळून नष्ट झाली याचे सर्वेक्षण करुन तात्काळ , हेक्टर १0 हजार रुपये अर्थ साहाय देण्यात यावे, गुरांढोरांना चारा डेपो उभारुन चार्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन देणे, प्रत्येक ग्रा.प.ला ५0 लाखाची रोहयोची कामे सुरु करावी इत्यादी मागणी करणारे निवेदन जि.प.अंतर्गत येत असलेल्या १५ गावच्या शेतकर्यांनी १ जुलै २0१४ जिल्हाधिकारी वाशिम व तहसिलदार वाशिम यांना निवेदन दिले हे करुन सर्वेक्षण न झाल्यामुळे आखेर ७ जुलै २0१४ रोजी नथ्थुजी कापसे यांच्या पुढाकाराने २0 ते २५ गावाच्या शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. यावेळी जि.प.सदस्य अन्नपुर्णा किसनराव मस्के, किसनराव मस्के, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष परशराम भोयर, जनार्दन भोयर, अंबादास काकडे, लिंबाजी भुसारे, आत्माराम राठोड, उपसरपंच उषा गजानन गंगावणे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाला नुकसानीचे सर्वे करण्याचा आदेश दुरध्वनीवरुन जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले . प्रत्यक्षात मात्र अद्याप कोणतेही सर्वेक्षण झाले नाही.
दुबार पेरणी सर्वेक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: July 14, 2014 23:44 IST