शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

तपासणीविना १४ व्या वित्त आयोगाचा निधी देऊ नका!

By admin | Updated: April 2, 2016 01:20 IST

मालेगाव पं. स. पदाधिका-यांचा एल्गार.

मालेगाव (वाशिम) : तपासण्याविना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचे देयक काढण्याला गटविकास अधिकार्‍यांनी पायबंद घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मालेगाव पंचायत समिती उपसभापती कल्पना अंभोरे यांच्या नेतृत्वात समस्त पं.स. सदस्यांनी गुरुवारी गटविकास अधिकार्‍यांना दिला.चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र काही ग्रामपंचायतच्या विकास कामांची पूर्तता तथा मोजमापांचे मूल्यांकन आणि काम पूर्णत्वास गेल्याचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच १४ व्या वित्त आयोगाचा निधी परस्पर विकास कामांचे नावावर उचल केल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी श्‍वेता काळे यांचे लक्षात आले होते. तेव्हा काळे यांनी संबंधित बँकांना ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाचा निधी देण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी महागावकर यांनीही हेच धोरण सुरु ठेवले. मात्र, या कामात पारदर्शकता असावी, या भूमिकेतून मालेगाव पंचायत समितीचे उपसभापती कल्पना विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात आणि सभापती कुसुम लबडे यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पं. स. सदस्य दीपक राऊत, गजानन शिंदे, ज्ञानबा सावले, संजयराव देशमुख, उद्धवराव राऊत, सतीश माने, रत्नमाला उंडाळ, रुख्माबाई दहात्रे, नंदाबाई संजय पवार, माजी उपसभापती शिवाजी बकाळ, छाया गजानन शिंदे, रेणुका गजानन लोखंडे, शिल्पा पंकज देशमुख, मंगला धन्दरे, मंगला गवई, अन्नपूर्णा दीपक भुरकाडे आदी सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी तपासणी व नियमानुसार काम झाल्याची अधिकारी-पदाधिकारी मंडळींनी खातरजमा केल्यानंतरच निधी देण्यावर सदस्य ठाम होते.