शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारण निधीबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 03:01 IST

पीक विमा काढलेले शेतकरी वगळले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाशिम, दि. 0२- दुष्काळ निवारण निधी म्हणून केंद्र शासनाने राज्याला १२00 कोटी रुपये मंजूर केले असून, यासाठी पात्र ठरणार्‍या जिल्ह्यांमध्ये वाशिमचाही समावेश आहे. मात्र, याअंतर्गत जिल्ह्याच्या वाट्याला किती निधी येणार? पीक विमा भरणारे शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरतील का? नेमके निकष इतरही प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.सन २0१५-१६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये नजिकच्या हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. मात्र, जिल्हा प्रशासानाच्या उदासीन धोरणामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पिकाच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहिले. अशातच आता पुन्हा केंद्र शासनाने राज्याला मदत व पुनर्वसन योजनेंतर्गत १२00 कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला. मात्र, या प्रकरणी शासन-प्रशासन पातळीवरून अद्याप कुठलीच ठोस हालचाल झालेली नाही. जिल्हा प्रशासनालाही यासंबंधी कुठलेच दिशानिर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांसोबतच प्रशासनही संभ्रमात सापडले आहे.विमा न काढणार्‍या शेतक-यांना लाभ..गतवर्षी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विमा लागू झालेले तद्वतच चालूवर्षी पीक विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांना दुष्काळ निवारण निधीतून ह्यछदामह्णही मिळणार नाही. पीक विमा न काढणार्‍या शेतकर्‍यांना मात्र या निधीतून आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत राज्य शासनाचे दिशानिर्देश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. मात्र, पीक विमा न काढणार्‍या शेतकर्‍यांना मदत मिळाल्यास ही रक्कम ३८ कोटी ३८ लाख रुपये असून, यासंदर्भात शासनाला यापूर्वीच कळविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.केंद्र शासनाकडून दुष्काळ निवारण मदतनिधी म्हणून राज्याला १२00 कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, यासंदर्भात शासनाचे अद्याप कुठलेच दिशानिर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. पीक विमा न काढणार्‍या शेतकर्‍यांना ३८ कोटी ३८ लाख रुपये मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविलेला आहे.- राहुल द्विवेदीजिल्हाधिकारी, वाशिम