शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शाळा इमारत मोडकळीस

By admin | Updated: April 27, 2017 00:36 IST

अपघाताची शक्यता : ६७ वर्षापूर्वीचे मातीचे बांधकाम

उंबर्डाबाजार : येथुन जवळच असलेल्या मौजे दुघोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी वरिष्ठ शाळेच्या जुन्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ६७ वर्षापुर्वी या शाळेच्या इमारतीचे मातीत बांधकाम झाले असल्याने शाळेची इमारत मोडकळीस आली असून शिक्षक वर्ग जीव मुठीत घेवुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. तर विद्यार्थी सुध्दा जीव धोक्यात घालुन शिक्षण ेघेत असतांना शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीचे मात्र या प्रकाराकडे हेतपुरुस्पर दुर्लक्ष दिसून येत असल्याने पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे. आगामी शैक्षणिक सत्राच्या अगोदर शाळेला नवीन चार वर्ग खोल्या उपलब्ध झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांच्यावतीने शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उध्दव पायरु गवई यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातुन दिला आहे.दुघोरा येथील जिल्हा परिषद प्राथमीक मराठी वरिष्ठ शाळेची स्थापना ६ जुलै १९४९ साली होवुन सदर शाळेच्या चार वर्गखोल्याचे बांधकाम मातीत झाले असल्याने इमारत धोकादायक होवुन अनेक ठिकाणी क्षतीग्रस्त होवुन शाळेच्या काही भिंती वाकल्या सुध्दा आहे.शाळेला १ ते ८ पर्यंत वर्ग असुन जवळपास २५० विद्यार्थी शिक्षण घेत असून सात वर्ग खोल्यापैकी चार ६७ वर्षापुर्वी मातीत बांधकाम झालेल्या वर्ग खोल्यांचा समावेश आहे. जुन्या इमारतच्या मागील बाजुची अर्धेअधिक टिनपत्रे सुसाट्याच्या वाऱ्यात उडुन गली असून टिनपत्र्याखाली असणारे खांब सुध्दा मोठ्या प्रमाणात तुटुन पडली आहे. खिडक्यांची अवस्था सुध्दा पाहण्यासारखीच आहे. इमारतीवर सद्यस्थितीत असलेली टिनपत्रे व खांब विद्यार्थी तथा शिक्षकांच्या अंगावर पडतील याचा नेमच राहिला नाही. विशेष म्हणजे शाळेच्या स्वच्छतागृहाला लागुनच उघड्यावर विज वितरण कंपनीचे ट्रॉन्सफॉर्मर असून फ्युज बॉक्स उघडाच असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच ट्रॉन्सफॉर्मर मधील विजेच्या जीवंत तारा शाळेच्या इमारती वरुन गेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे. आमचे गाव आमचा विकास योजनेंतर्गत शाळा दुरुस्ती साठी ५ लाख रुपयाचा निधी गेल्या एक वर्षापासून ग्रामपचांयतीच्या खात्यात पडुन संबंधीतांना मात्र शाळा दुरुस्तीचा विसर पडलेला दिसत आहे. याबाबत मुख्याध्यापक,, शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी मंडळीनी अनेकदा अर्ज, विनंती, तक्रारी करुन शिक्षण विभागाला सुचित केले. मात्र श्क्षिण विभागाने अद्याप लक्ष दिले नाही.