शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या आगमनासाठी जिल्हावासी सज्ज

By admin | Updated: August 27, 2014 00:17 IST

उत्साहावर महागाईचे सावट : बाजारपेठा गेल्या गजबजून, मंडप उभारणी अंतिम टप्प्यात

वाशिम : गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे आली असून, गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत होत आहे. मात्र, कोरड्या दुष्काळाचे सावट आणि गणरायाच्या आगमन मार्गावरील खड्डय़ांचे विघ्न आदी बाबी गणेशभक्तांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन पाडण्यास कारणीभूत ठरत आहेत. गणरायाच्या आगमनाची चाहूल सर्व गणेशभक्तांना लागली आहे. घरगुती गणरायासोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणार्‍या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम शहरासह जिल्ह्यात प्रत्येक शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक पर्वणी असते. या उत्सवासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. रस्ते दुरुस्ती, परवाने, होडिर्ंग्ज आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था स्थानिक प्रशासन करीत असते. उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, हा या सर्व तयारीचा उद्देश असतो. एकिकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह तर दुसरीकडे कोरड्या दुष्काळाचे सावट, महागाईची झळ आणि रस्त्यांवरील खड्डे अडचणीच्या बाबी ठरत आहेत. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसून विविध प्रकारच्या मूर्तींची बुकिंग केली आहे. आता केवळ गणरायांच्या आगमनाची आस लागून आहे.