या बैठकीत केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरवाढीच्या विरोधात आंदोलन आणि जनजागृती मोहिमेचा कार्यक्रम या बैठकात ठरवण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी २४ ते २६ फेब्रुवारी असे तीन दिवस जिल्हा काँग्रेस समितीच्या बैठका घेण्यात आल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची बैठक गांधी भवन येथे घेण्यात आली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला गेला. बैठकीला माजी मंत्री आरिफ नसीम खानसह जिल्हयातील आमदार अमित झनक, काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, वाशिम जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक, जिल्हा प्रभारी प्रकाश साबळे,जि.प. अध्यक्ष डॉ श्याम गाभणे, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, वाशिम महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई गणोजे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष प्रा. अबरार मिर्झा, जिल्हा प्रवक्ता दिलीप भोजराज, वाशिम शहर अध्यक्ष शंकर वानखडे, जावेद सौदाग र,मंगरूळपीर शहर अध्यक्ष सलीम जहागीरदार, मानोरा नगराध्यक्ष रेखा अल्ताफ बेग, मानोरा तालुकाध्यक्ष इफतेखार पटेल, प्रकाश राठोड, श हर अध्यक्ष फैझल नागाणी, कारंजा शहर अध्यक्ष हमीद शेख यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी मो.युसूफ पुंजानी यांनी वाशीम जिल्ह्यातील पक्षातील कार्याबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हयातील काॅंंग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:43 IST