शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’चा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 18:22 IST

Washim News : जिल्हाधिकारी कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हास्तरीय कृती समितीच्या सभेत ते बोलत होते.

वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील दरी कमी करणयासाठी मुलींच्या जन्माचे स्वागत करणे अपेक्षीत आहे. मुलीचा जन्म झालेल्या घरासमोर ग्रामपंचायतीने मुलीच्या नावे एक झाड लावून तिच्या जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हास्तरीय कृती समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त एम. जी. वाठ, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त वि. द. सुलोचने, अशासकीय सदस्य डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, मुलींच्या जन्माचे महत्व पटवून देण्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहीम राबवावी. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्तींना सहभागी करून घ्यावे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करणे, स्त्रीभ्रूण हत्या हा कायद्याने गुन्हा असून असे प्रकार होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईनविषयी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. मुलींच्या जन्मदराविषयी तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावरून करण्यात येत असलेल्या जनजागृतीविषयी माहिती घेतली. 

गर्भलिंग तपासणी होत असल्यास माहिती द्या

जिल्ह्यामध्ये गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची माहिती गोपनीयरित्या प्राप्त होण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीमार्फत ८४५९८१४०६० हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची गोपनीय माहिती अथवा तक्रारी नागरिकांना या हेल्पलाईन क्रमांकावर पाठविता येतील, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जोल्हे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम