शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली रुग्णवाहिकेची व्यवस्था; पुरामुळे रस्ता बंद असल्याने जिवाला होता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 15:13 IST

वाशिम: जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आल्याने तोंडगावचा रस्ता बंद झाला. त्यामुळे एक गर्भवती महिलेचा जीव धोक्यात ...

वाशिम: जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आल्याने तोंडगावचा रस्ता बंद झाला. त्यामुळे एक गर्भवती महिलेचा जीव धोक्यात येऊ लागला होता. ही माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना कळली. त्यावेळी जिन्हाधिकाऱ्यांनी त्या गर्भवतीस प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहाेचवण्यासाठी कन्हेरगावमार्गे २० किलोमीटर अंतराहून रुग्णवाहिका आणण्याची व्यवस्था आरोग्य विभागाला सुचना देऊन केली.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांनी ८ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील तोंडगाव परिसरात अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि पीक नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांनी चंद्रभागा नदीला पूर असल्यामुळे नदीच्या अलीकडील काठावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. नदीला पूर असल्यामुळे रस्ता बंद होता. त्यामुळे तोंडगाव येथील एक गर्भवती महिला प्रसवपिडेत त्रस्त असल्याचे त्यांना कळले. त्यामुळे या गर्भवतीस बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्या करसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका २० किमी अंतरावरून कन्हेरगाव मार्गावरुन पाठवून त्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांच्या सूचनेवरून करण्यात आली.