शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४0६ अंगणवाडी केंद्रांत पोषण आहार वाटप ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:59 IST

वाशिम: अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक  बाल विकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये  म्हणून स्थानिक पातळीवर ६७0 ठिकाणी पर्यायी व्यवस्था  करण्यात आली तर अद्याप ४0६ अंगणवाड्यातील पोषण  आहार वाटप ठप्प आहे. 

ठळक मुद्देकर्मचार्‍यांचा संप ६७0 ठिकाणी पोषण आहाराची पर्यायी व्यवस्थाबचत गटामार्फत पोषण आहार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक  बाल विकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये  म्हणून स्थानिक पातळीवर ६७0 ठिकाणी पर्यायी व्यवस्था  करण्यात आली तर अद्याप ४0६ अंगणवाड्यातील पोषण  आहार वाटप ठप्प आहे. वाशिम जिल्हय़ात १,0७६ अंगणवाडी केंद्र असून, तेवढय़ाच  अंगणवाडी सेविका  कार्यरत आहेत. विविध प्रलंबित  मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील  अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर गेले  आहेत. या संपात वाशिम जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचारी  सहभागी आहेत. त्यामुळे सुरुवातीला वाशिम तालुक्याचा अपवाद  वगळता उर्वरित पाचही तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना कुलूप  लागले होते तसेच बालकांचा पोषण आहारदेखील ठप्प होता. सं पामुळे कुपोषित बालके व अंगणवाडीतील पोषण आहाराचे  लाभार्थी बाधित होऊ नये तसेच आहार पुरवठय़ात खंड पडू नये  यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना महिला व बाल  विकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला १३ सप्टेंबरला  केल्या होत्या. स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणेतील  कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सहायक, आरोग्य  सहाय्यिका, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळेचे शिक्षक, ग्राम  शिक्षण समितीच्या सहाय्याने तसेच स्थानिक गरम ताजा आहार  पुरविणारे महिला बचत गट आदींच्या माध्यमातून पर्यायी व्यवस् था करावी आणि पोषण आहाराचे वाटप पूर्ववत करावे, अशा  सूचना देण्यात मिळाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश  पाटील यांनी महिला व बालकल्याण विभागाला नियोजन  करण्याचे निर्देश दिले. महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. इंगळे व बाल विकास  प्रकल्प अधिकार्‍यांनी बचत गट, आशा व सेविकांच्या माध्यमा तून जिल्हय़ातील ६७0 अंगणवाडी केंद्रांत पोषण आहार वाट पाची पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरित ४0६ अंगणवाडी  केंद्रांत तूर्तास पर्यायी व्यवस्था नसल्याने पोषण आहार वाटप ठप्प  आहे. या अंगणवाडी केंद्रांना कुलूप लागलेले आहे. जिल्हय़ा तील सर्वच अंगणवाडी केंद्रांत लवकरच पोषण आहार वाटपाची  पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे इंगळे यांनी सांगितले.