शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विविध प्रमाणपत्रांचे होणार शालेयस्तरावर वाटप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 19:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शालेय स्तरावर विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी २७ जुलै रोजी वाशिम येथील आढावा बैठकीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांमार्फत शालेय स्तरावर विशेष शिबिरांचे नियोजन केले जाणार आहे.मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. दहावी व ...

ठळक मुद्देमहाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शालेय स्तरावर विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी २७ जुलै रोजी वाशिम येथील आढावा बैठकीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांमार्फत शालेय स्तरावर विशेष शिबिरांचे नियोजन केले जाणार आहे.मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर तहसील कार्यालयांत विविध कागदपत्रे काढण्यासाठी अगोदरच गर्दी असते. या दरम्यान मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी लागणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सदर प्रमाणपत्रे व दाखले  एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याची मागणी शाळांनी करणे अपेक्षीत आहे.  शाळांच्या मागणीनुसार शालेयस्तरावर महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने तहसील कार्यालयांमार्फत संबंधित शाळांमध्ये प्रमाणपत्र वितरणासाठी शिबिरांचे नियोजन केले जाणार आहे.