शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत व्यत्यय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:19 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतक-यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाथकबाकीदार शेतक-यांना मिळणार दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतक-यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहिर केला. यानुसार २००९ पासून ते ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्यात आले. तसेच नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत अथवा २५ टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन अशा ठिकाणी शेतकºयांना मोफत स्वरुपात आॅनलाईन अर्ज व घोषणापत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, सर्व्हर डाऊन होणे, ‘थम्ब’ न घेणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे. ग्रामीण भागात तर शेतकºयांना आपले सरकार, महा-ई सेवा केंद्रांवर तासन-तास ताटकळत बसावे लागत आहे.