शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोठेगाव प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होणार!

By admin | Updated: March 15, 2017 02:52 IST

एससी, एसटी आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांची ग्वाही : मोठेगावच्या प्रकरणाची चौकशी.

वाशिम, दि. १४- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे व सदस्य (विधी) सी. एल. थूल यांनी १४ मार्चला दलित विवाहिता मृत्यूप्रकरणी मोठेगाव (ता. रिसोड) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच आजूबाजूच्या इतर नागरिकांशीही चर्चा केली. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी आयोग प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, तहसीलदार अमोल कुंभार आदींची उपस्थिती होती. मोठेगाव येथील दलित विवाहित मृत्यू प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष कांबळे व सदस्य न्यायमूर्ती थूल आज वाशिम जिल्हा दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृत महिलेचे आई-वडील व मुलांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर घटना घडलेल्या घराच्या आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांशीही वार्तालाप केला. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्याकडून सुरु असलेल्या तपासाची स्थिती जाणून घेतली. तसेच तपासामध्ये कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.मृत महिलेचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी पोलिसांना तपासात सहकार्य करावे. कोणालाही या प्रकरणाविषयी कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन कांबळे व न्यायमूर्ती थूल यांनी केले. या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्यासाठी व केस कोर्टात उभी राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती- जमाती आयोग पोलीस प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करेल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे सर्वांगीण बाजूने तपास करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.