शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:39 IST

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संसदेच्या अधिवेशनपूर्व झालेल्या बैठकीत खासदार गवळी यांनी हा प्रश्‍न मांडला होता. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे ...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संसदेच्या अधिवेशनपूर्व झालेल्या बैठकीत खासदार गवळी यांनी हा प्रश्‍न मांडला होता. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने ८ एप्रिल रोजी नामदार जयंत पाटील यांनी खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील बॅरेजेसचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यातील मंगरूळपीर तालुक्यामधील अडाण नदीवरील घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा बॅरेज या तिन्ही बॅरेजेसना पाणी उपलब्ध झाल्यानंतर २००८-०९ मध्ये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती परंतु निधीअभावी सदरच्या बॅरेजेसच्या प्रकल्पांची कामे सुरू करता आली नाहीत. ही तिन्ही बॅरेजेस या परिसरातील शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार असल्यामुळे खा. गवळी यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये या तीनही बॅरेजेसला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करण्याविषयी निर्णय झाला असून घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा बॅरेजेसला निधी उपलब्धतेकरिता वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याची माहिती खासदार गवळी यांनी दिली आहे. हे तीनही बॅरेजेस काम आता पूर्णत्वाकडे जाऊन मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे. तसेच रिसोड तालुक्यामधून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर कार्यान्वित असलेल्या बाळखेडा, भापूर, धोडप, मसलापेन, आसेगाव पेन, येवती या सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर व्हावे याकरिता या परिसरातील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासून मागणी आता पूर्ण होत आहे. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढल्यानंतर वाशिमकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटून नळगंगा व वैनगंगा या नदीजोड प्रकल्पांच्या पेनटाकळी प्रकल्पातून पाणी घेतल्यामुळे येथील बॅरेजेसवरील शेतकऱ्यांनाही पाण्याची कमतरता भासणार नाही. वाशिम जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे ४८ प्रकल्प असून त्यापैकी १२ प्रकल्प हे अपूर्णावस्थेत आहेत. यावरही चर्चा झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार, लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभागाचे व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.