शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकास आराखड्याच्या अभ्यास अहवालावर चर्चा    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:21 IST

विदर्भाचा विकास आराखडा बनविण्यासाठी अभ्यास अहवाल तयार केला जात असून विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायन, सहसंचालक अ. रा. देशमुख यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकार्‍यांसोबत बुधवारी बैठक घेऊन चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शनजिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विदर्भाचा विकास आराखडा बनविण्यासाठी अभ्यास अहवाल तयार केला जात असून विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायन, सहसंचालक अ. रा. देशमुख यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकार्‍यांसोबत बुधवारी बैठक घेऊन चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरूणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बळवंत गजभिये, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक टी. एन. खांडेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कृषीपूरक व्यवसाय निर्मिती करून शेतीला जोडधंदा उपलब्ध करून देणे, शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे, पारंपारिक शेतीसोबतच शेती प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी केम प्रकल्प, आत्मा व जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करणे आदी बाबींवर चर्चा झाली. जिल्ह्यात सोयाबीन, तुरीचे उत्पादन अधिक असल्याने या दोन घटकांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी चर्चा करण्यात आली. सोबतच पशुसंवर्धन, कौशल्य विकास, सिंचन प्रकल्प, महावितरण, ग्रामीण रस्ते विकास, आरोग्य व शिक्षण विभागाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

वाशिम जिल्हा विकास अहवालावरही चर्चामानव निर्देशांक कमी असलेल्या वाशिम जिल्ह्याचा जिल्हा विकास अहवाल विदर्भ विकास मंडळामार्फत केला जाणार असून याची जबाबदारी ‘यशदा’ संस्थेवर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायन व वाशिम जिल्हा विकास अहवालचे लेखक डॉ. निखील अटाळे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग प्रमुख, सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा विकास अहवाल पुस्तिकेच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यावर आधारित अहवाल तयार करण्याचे नियोजन करण्यात आले.