शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१५२ गावांच्या सुरक्षेसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज!

By admin | Updated: May 22, 2017 01:24 IST

मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्प्यात : अतिवृष्टी, पूर परिस्थितीपासून बचावाकरिता सात सुरक्षा पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच तथा अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून, मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करीत अतिवृष्टी, पूर परिस्थितीने बाधित होऊ शकणाऱ्या जिल्ह्यातील १५२ गावांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी सांगितले, की जिल्ह्यात सहा तालुक्यात सहा आणि जिल्हा पातळीवर एक, असे सात शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय वाशिम येथील छत्रपती बहूद्देशीय तरुण मित्र मंडळ, या दोन सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहणार आहेत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीदरम्यान बचाव कार्यासाठी दोन रबर बोटदेखील तैनात राहणार आहेत, अशी माहिती बोराडे यांनी दिली. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पेनबोरी, बाळखेड, चिचांबाभर (ता. रिसोड), उकळीपेन (ता. वाशिम) आणि बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळपीर) ही पाच गावे बाधित होतात. त्यापैकी बोरव्हा खुर्द या गावाचा तीन बाजूने संपर्क तुटतो. त्यादृष्टीने सदर पाचही गावांमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या उपाययोजनांची तयारी पूर्ण झालेली आहे. दोन ते तीन दिवस सलग पाऊस सुरू राहिल्यास, अतिवृष्टी झाल्यास पेनटाकळी धरणाचे पाणी सोडण्यात आल्यास किंवा जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या ‘ओव्हरफ्लो’ झाल्यास १५२ गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, त्या दृष्टीनेही शोध व बचावकार्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, गावागावातील नागरिकांना प्रत्यक्ष स्वत:च्या बचावासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत, अशी माहिती बोराडे यांनी दिली.