शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर जैन सोशल गु्रपची राज्यस्तरीय सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:59 IST

वाशिम: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्यावतीने स्थानिक अकोला नाका येथील जैन भवन येथे आयोजित राज्यस्तरीय सभा सोमवारी उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान,  छत्तीसगड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातुन  जैन सोश्ल ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.

ठळक मुद्देविविध प्रदेशातील मान्यवरांची उपस्थिती विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्यावतीने स्थानिक अकोला नाका येथील जैन भवन येथे आयोजित राज्यस्तरीय सभा सोमवारी उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान,  छत्तीसगड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातुन  जैन सोश्ल ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला सुखानंद पाटणी यांच्याहस्ते मुख्यव्दाराचे  फित कापुन  उद्घाटन  करण्यात आले, तर धर्मध्वजारोहन कैलासचंद पाटणी यांच्याहस्ते तसेच सभा मंडपाचे उद्घाटन जळगाव येथील प्रदीप  जैन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुंबईचे उद्योगपती सुभाशचंद पाटणी, दिगंबर जैन सोशल गु्रप फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष  हसमुख जैन गांधी, राष्ट्रीय महासचिव राजेंद्र जैन, महाराष्ट्र विभागीय प्रभारी व शपथविधी अधिकारी मनोहर झांजरी,  नवीनसेन, महेंद्र काला, सुभाष काला,  संयोजक प्रविण पाटणी, विलास पाटणी, वाशिम चे अध्यक्ष हरिष बज, सचिव संजोग छाबडा,  विपीन बाकलीवाल,  प्रकाशचंद गोधा, श्वेता बडजातीया, रंजिता गोधा,  रमेशचंद्र बज, अािद उपस्थित होते. समाजाचे ज्येष्ठ माणिकचंद बज यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आंबेझर पार्श्वनाथ मंदिर पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत तसेच अकोला येथील श्रृती अजय पाटणी हिने आई या विषयावर नृत्य नाटीका सादर करुन सर्वांची मने जिंकली. शिल्पा सचिन पाटणी याच्या मुलांनी व प्रियंका अनुप बाकलीवाल हिने सांस्कृतीक नाटीकेचे सादरीकरण केले. राष्ट्रीय अध्यक्ष हसमुख गांधी जैन यांनी  यांच्याहस्ते फेडरेशनच्या निर्देशिकेचे विमोचन करण्यात आले.   कार्यक्रमाचे संचालन रवि बज व सुनिता बज यांनी केले व आभार राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन इंदोर यांनी मानले. सभेचे प्रास्ताविक हरिष बज यांनी तर संयोजक प्रविण पाटणी यांनी गु्रपच्या कार्याची माहिती विषद केली.