वाशिम : वाशिम शहरातील भारत पेट्रोलियमच्या पंपावर डिझेलचा तुटवडा आल्यामुळे १५ मे रोजी काही तासापर्यंंंत वाहनधारक त्रस्त झाले होते. मात्र सायंकाळच्या वेळी डिझेलचा पुरवठा पुन्हा सुरु झाल्यामुळे वाहनधारकांचा जीव भांड्यात पडला. वाशिम शहरात भारत पेट्रोलियमचे तीन पंप, हिंदुस्थान पेट्रोलियमचे तीन तर इंडियन पेट्रोलियमचा एक असे एकूण सात पंपाद्वारे पेट्रोल व डिझेलची विक्री केल्या जाते. दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढ असल्यामुळे पेट्रोल डिझेलची मागणीसुद्धा वाढली आहे. मात्र १५ मे रोजी सकाळी ८ वाजेनंतर वाशिम शहरातील एन.आर. शर्मा यांच्या भारत पेट्रोलियम पंपावर कंपनीचा टँकर डिझेल घेवून आले नाही. त्यामुळे डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र दुपारी तीन वाजता कंपनीचे टँकर डिझेल घेवून पोहोचल्यामुळे पुन्हा पुरवठा सुरळीत झाला होता. यावेळी अनेक ग्राहकांनी डिझेल असतांना पेट्रोलपंप संचालक देत नसल्याचा आरोप केला. यावर संचालकांनी डिझेल विक्रीसाठीच बसलो आहोत, न देण्याचा प्रश्नच उदभवत नाही अशी प्रतिक्रीया दिली.
डिझेलचा तुटवडा
By admin | Updated: May 15, 2015 23:13 IST