शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 7, 2014 23:57 IST

धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने शेकडो मेंढय़ासह समाज बांधवाच्या उपस्थितीत भव्य मोर्चा

शेगाव: धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने शेकडो मेंढय़ासह समाज बांधवाच्या उपस्थितीत आज ७ ऑगस्ट रोजी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. स्थानिक धनगर नगरापासून सुरुवात झालेला हा मोर्चा यशवंतदादा बुरुंगले, अशोकराव देवकते व इतर पदधिकार्‍यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो मेंढय़ासह धनगर समाज बांधव पारंपारीक वेशभुषेत शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. ह्ययळकोट यळकोट जय मल्हार, आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहीजे, आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा गगनभेदी घोषणा मोर्चाच्या दरम्यान देण्यात आाल्या. हा मोर्चा शिवाजी चौक, अग्रेसन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे, तहसिल कार्यालयावर धडकला. त्यानंतर तहसिलच्या आवारात धनगर समाजनेते शरद वसतकार, अशोकराव देवकते, दादासाहेब बुरुंगले, अलकाताई गोडे, विजय खरात, भारत वाघ, शत्रुघ्न पाचपोर, भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने, भाजप जिल्हा सचिव प्रदिप सांगळे आदिंनी मार्गदर्शन केले. यानंतर तहसिलदारांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, प्रमोद सुळ, शिवाजी कांबळे, अमोल पिंगळे, केशव हिंगणे, बाळु बुरुंगले, संतोष माने, संतोष पिंगळे, हनुमान बुरुंगले, प्रकाश विरकर, गणेश ढाळे, अमर बोरसे, मंगेश करे, राजाभाऊ पालवे, मुना कचरे, अशोक करे, गजानन हजारे, प्रमोद जयस्वाल, रमेश सोलनकर, मनोहर मासाळ, मधुकर मासाळ, अनंता घुले, सतिष सुळ, प्रविण सुरोसे आदिंसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.