राजरत्न सिरसाट/अकोला अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणार्या जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे ३0 टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर या कृषी विद्यापीठाने भर दिला आहे. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जास्त्रोत मंत्रालयाद्वारे देशात जैववायू निर्मिती, राष्ट्रीय प्रकल्प राबविण्यात येत असून, २00६ पर्यंंत या प्रकल्पांतर्गत देशात ३८.३४ लाख कौटुंबिक वा पराच्या जैववायू सयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू सयंत्रामध्ये गायी, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. या सयंत्राला पाण्याची गरज असते; परंतु उन्हाळ्य़ात पाणी मिळत नसल्याने बहुतांश सयंत्र बंद पडले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू सयंत्रामध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे सयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या सयंत्रयाचे डिझाईन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदीचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे. विकसित सयंत्र ३0 टक्केपेक्षा जास्त बायोगॅस निर्माण करते. या सयंत्राचे सर्व प्रकारचे परीक्षण करण्यात आले आहे. पारंपरिक बायोगॅस सयंत्राला हा उत्तम पर्याय असल्याचे कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी स्पष्ट केले. -सुधारित बायोगॅस तंत्रज्ञान-* स्थिर घुमट असलेले नवे सयंत्र* ताजे व ओले शेण भरण्यास योग्य * शेणपाण्याचे मिश्रण करण्याची गरज नाही* सयंत्र भरणे सोपे जाते* मळी लवकर वाळते त्यामुळे वाहतुकीचा खर्च होत नाही.* बांधकामाचा खर्च सामान्य रचनेच्या सयंत्राएवढाच* ३0 टक्केपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन या नवीन तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सयंत्रापेक्षा ३0 टक्केपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन केले जाते. या सुधारित सयंत्राचा धारणाकाळ सामान्य सयंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे जैववायू उत्पादनात वाढ झाली आहे. या पाचीत मळी बाहेर येण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे.
नवे बायोगॅस तंत्रज्ञान विकसित!
By admin | Updated: October 17, 2014 00:08 IST