शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाचा विकास खुंटला

By admin | Updated: August 26, 2014 22:42 IST

विकास केवळ कागदावर : शासकीय योजना वार्‍यावर

मानोरा : मानोरा तालुक्यात ११३ गावे असून, ७८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्या तुलनेत केवळ ४७ ग्रामसेवक कार्यरत आहेत. संख्येने कमी असलेले ग्रामसेवक आणि त्यातील अर्धेअधिक जिल्हा किंवा इतर ठिकाणावर वास्तव्याला असल्यामुळे ग्रामीण विकासाचे तीन तेरा वाजले आहे. नागरिकांना महिनोमहिने ग्रामसेवकांचे दर्शनच होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. ग्रामीण भागात शासनाच्या योजना पोहचविणे व जनतेच्या समस्या दूर करणे ही महत्त्वाची जबाबदारी असलेल्या ग्रामसेवकांमुळेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासन व ग्रामस्थामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामसेवकांचे स्थान असते; पण मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामसेवकांचे दर्शनच होत नसल्याने नागरिकांचा शासनासोबत असलेला संपर्क तुटल्यासारखा झाला आहे. ग्रामसेवकाला शोधण्यासाठी नागरिकांना मजुरी पाडून फिरावे लागत आहे. अनेक ग्रामसेवक १५ दिवसांतून अथवा आठवड्यातून एकदाच काम करतात. उर्वरित सहा दिवस घरी आराम करतात. पंचायत समितीचे दुर्लक्षित धोरण हे सुद्धा या बाबीला कारणीभूत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही हे प्रकार बंद करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. याच कारणामुळे अनेक नागरिकांना आपल्या गावचा ग्रामसेवक कोण याची कल्पनासुद्धा नसते. ग्रामीण भागातील विकासाला बळकटी देणारी संस्था म्हणून ग्रामपंचायत ओळखल्या जाते. शासनस्तरावरील योजना सरळ ग्रामपंचायतकडे येतात. या निधीतून संबंधित गावांचा विकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते. यामध्ये शासनाचा प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक व नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून सरपंचाची महत्त्वाची भूमिका असते; पण शासनाची योजना ग्रामपंचायतला मिळाल्यानंतर तिची योग्यरित्या अंमलबजावणी होईल याची कोणतीही खात्री नसते. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार हे अधिकार्‍यांसारखे वागतात व तिघेच सर्व निर्णय घेतात. त्यामुळे विकासकामाचा बोजवारा उडतो. परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोगराईनेसुद्धा आपले हातपाय पसरविणे सुरू केले आहे. घराघरात रुग्णांची संख्या आहे; मात्र या अवस्थेतही गावच्या स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष नाही. पिण्याच्या पाण्यामधे ब्लिचिंग पावडर टाकण्याची तसदी कुणी घेतली नाही. परिणामी रुग्णसंख्या वाढतच आहे. गावामधून लाखो रुपयांचा कर गोळा होत असला तरीही फुटलेली पाईप लाईन, विहिरीतला गाळ, पथदिवे या गोष्टीची वेळीच पूर्तता केली जात नाही. शासनाच्या लाखो रुपयाच्या निधीचा नेमका उपयोग कुठे केला जातो, याचे उत्तर कुण्याही ग्रामसेवकाजवळ नाही. अनेक गावात ग्रामसभा या केवळ कागदोपत्री दाखविल्या जातात. वरिष्ठाकडून याची फेरतपासणीसुद्धा होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास खुंटला आहे.