शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत लसीचे ३० हजार डोस मोफत देण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:41 IST

Corona Vaccine : समता फाऊंडेशन रिसोड या सामाजिक संघटनेने लसीचे ३० हजार डोस मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज  नेटवर्करिसोड : १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण राज्यात बंद असले तरी रिसोड शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. याचे कारण म्हणजे समता फाऊंडेशन रिसोड या सामाजिक संघटनेने लसीचे ३० हजार डोस मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाला ५ जूनपासून रिसोड शहरात प्रारंभ झाला आहे. समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरूषोत्तम अग्रवाल यांची रिसोड ही जन्मभूमी आहे. रिसोडच्या विकास कार्यामध्ये तसेच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दरम्यान, मदतीचा हात पुढे करणारे काही सद्गृहस्थदेखील समोर येत आहेत. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. वयोगटानुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून, लसीचा तुटवडा असल्याने गत १५ दिवसांपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात येत आहे. नेमका याच वयोगटातील नागरिकांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याने सर्वांचे लसीकरण व्हावे या उदात्त हेतूने समता फाऊंडेशनने रिसोड शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी लसीचे ३० हजार डोस मोफत देण्याचा संकल्प केला. रिसोड शहराची लोकसंख्या ४५ हजारांच्या घरात आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या २४ हजारांच्या आसपास आहे. शहरातील तीन केंद्रात दररोज १५०० डोस देण्याचे नियोजन आहे. शहरातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून समता फाउंडेशनने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

रिसोड शहरात तीन केंद्रांमध्ये लसीकरणरिसोड शहरातील तीन केंद्रांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. कुठेही गोंधळ, गर्दी दिसून येत नाही.

टॅग्स :RisodरिसोडCorona vaccineकोरोनाची लस